गावागावात शाखा व घराघरात शिवसेनेचा कार्यकर्ता, शिवसेनेचा तालुक्यात झंझावात -नितीन शिंदे
इंदापूरः तालुक्यातील गावागावात शाखा व घराघरात शिवसेनेचा कार्यकर्ता आशी संकल्पना ठेवून इंदापूर तालुक्यात शिवसेनेचे धडाकेबाज नियोजन,व झंझावात इंदापूर तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केला आहे, दिनांक- १६/१२/२०२० रोजी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख मा.संजीवजी शिरोडकर साहेबांचा इंदापुर तालुक्यातील सर्व ७ जिल्हा परिषद गटांचा ग्रामपंचायत निवडणुक, शाखा उद्घाटन नियोजन व युवक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश या निमित्त दौरा पार पडला. यावेळी श्री. संजीवजी शिरोडकर साहेब यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे हे संपूर्ण दौऱ्यात सहभागी होऊन नियोजन करत होते.यापूर्वी दिनांक- १५/१२/२०२० रोजी काटी - वडापुरी जि.प.गटातील पदाधिकारी व शाखाप्रमुख यांची बैठक रेडा येथे पार पडली. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी श्री.संजीवजी शिरोडकर साहेब यांच्या हस्ते व तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी उपतालुकाप्रमुख धोंडिराम सोनटक्के, इंदापुर शहरप्रमुख मेजर महादेव सोमवंशी, तालुका समन्वयक अरुण पवार, माथाडी कामगार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संयुक्त सरचिटणीस दुर्वास शेवाळे, अमोल शिंदे उपस्थित होते.
बावडा - लाखेवाडी गटाची बैठक भोडणी याठिकाणी पार पडली. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपतालुकाप्रमुख संदिप चौधरी, इंदापुर शहरप्रमुख मेजर महादेव सोमवंशी, तालुका समन्वयक अरुण पवार, माथाडी कामगार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संयुक्त सरचिटणीस दुर्वास शेवाळे, विभागप्रमुख मारुती खोपकर,उपविभाग प्रमुख अनिल मोरे, अमोल शिंदे, कांबळे सर उपस्थित होते.
पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी व शाखाप्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा समन्वयक विशालदादा बोंद्रे, उपतालुकाप्रमुख आप्पासाहेब डोंगरे, विभागप्रमुख अंकुश गलांडे ,उपविभाग हेमंत भोसले, राखुडे महाराज, उपस्थित होते.
दुपारी निमगाव-निमसाखर जिल्हा परिषद गटाची बैठक पार पडली. यावेळीही अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी तालुका संघटक सुदर्शन रणवरे, विभागप्रमुख धनेश राऊत, शाखाप्रमुख सुरेश बनकर उपस्थित होते.
त्यानंतर सणसर- लासुर्णे जिल्हा परिषद गटाची बैठक पार पडली. यावेळीही अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख संजयभाऊ काळे, मा.तालुकाप्रमुख योगेशकाका कणसे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, उपतालुकाप्रमुख विजय शिरसट, विभागप्रमुख विजय गायकवाड उपस्थित होते.
सायंकाळी कळस - कळंब जिल्हा परिषद गटाची बैठक जंक्शन याठिकाणी पार पडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख संजयभाऊ काळे, मा.तालुकाप्रमुख योगेशकाका कणसे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, विभागप्रमुख दत्ता खुडे, उपविभागप्रमुख अमित बामणे उपस्थित होते.
सायंकाळी ७ वाजता भिगवण- शेटफळ गटाची बैठक भिगवण येथे पार पडली. यावेळी गटातील सर्व पदाधिकारी व शाखाप्रमुख उपस्थित होते. अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी तालुकाप्रमुख नितीन शिंदे, जिल्हा समन्वयक भीमरावआप्पा भोसले व प्रमुख मान्यवर संजीवजी शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संजयभाऊ काळे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, उपतालुकाप्रमुख बापू गायकवाड, विभागप्रमुख पांडुरंग वाघ, उपविभागप्रमुख दत्ता कदम ,शाखा प्रमुख पांचग्रे भिगवण शहरप्रमुख उपस्थित होते.
सदर दौऱ्याचे संपूर्ण नियोजन सतत आग्रेसर आसणारे इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी केले होते.
टिप्पण्या