इंदापुरः तालुक्यातील जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठण नं.1 आज दि.१५ ऑगष्ट २०२० रोजी ७४ वा स्वातंत्र्य दिन सकाळी नऊ वा.साजरा करण्यात आला. कोविड १९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझर, व सोशल डिस्टनसिंग पाळण्यात आले. तसेच शासनाने घालुन दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करून संस्थेच्या अध्यक्षा मा.जयश्री गटकुळ यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली असून अशा काळात कोरोनाबाधित व्यक्ती मृत पावला तर घरातील जन्म दिलेली मुले/नातेवाईक जवळ न येता परस्पर गायब होतात असे विदारक चित्र पाहून वाटते की माणसातील माणूसपण संपत चालले आहे पण दुसरीकडे गफुर सय्यद यांच्या सारखे कोविड योद्धा जीवावर उदार होऊन जात धर्म नातीगोती असा विचार न करता मृत कोरोना बाधितांचा अंत्यविधी करत सर्वश्रेष्ठ कर्म करीत आहेत मानवता जपणारी माणसे आजच्या युगात सर्वश्रेष्ठ ठरत आहेत अशा कोविड योद्धाचे महानकार्य माणूस म्हणून जगण्याचा आणि माणसाला सहकार्य करण्याचा संदेश जगाला देतात असे मत जिजाऊ ब्रिगेड पुणे(पूर्व) जिल्हाध्यक्षा प्रा डॉ जयश्री भास्कर गटकुळ यांनी व्यक्त केले. कोविड योद्धा मा. गफुर सय्यद यांनी अंगावर शहारे आणणारे अनुभव कथन करून कोरोनाशी सामना करताना चेहऱ्यावर स्वाभिमानाचे तेज ठेवून कोवीड योद्धे म्हणून निस्वार्थीपणे काम करताना जीवाची पर्वा न करता लढत राहून कोरोनावर मात करायची आहे. आपल्या काया वाचा मनाने जिवंत असलेली असंख्य माणसे जीवनातील आलेल्या या महामारीला, अडचणीला आव्हान समजून लढत आहेत. जगण्याची खरी किंमत दाखवणारे आणि माणसात हिंम्मत जागवणारे 2020 हे वर्ष सबंध जगाच्या चांगलेच स्मरणात राहील. असे मत मा. गफुरभाई सय्यद यांनी व्यक्त केले. संस्थेच्या उपाध्यक्षा विश्र्वाबाला गटकुळ यांनी प्रास्ताविक केले,कोविड योद्धा गफूरभाई सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राचार्य राजश्री जगताप यांनी मानले
टिप्पण्या