इंदापूर, येथील श्री नारायणदास रामदास शहापब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच इंदापूर लायनेस क्लब च्या वतीने शहा सांस्कृतिक भवनमध्येकोरोना योद्धे तसेच यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्वांना शिरखुर्मा पार्टी देण्यात आली. त्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताण हलकाझाला.
नगराध्यक्षा अंकिता शहा, श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,इंदापुर अर्बन बॅंकेचे चेअरमन भरतशेठ शहा, इंदापूर लायनेस क्लबच्या अध्यक्षा सायरा अत्तार, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई अत्तार व सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला.
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी या उपक्रमास भेट देऊन कोरोना योद्धे तसेच कार्यक्रमाचे मुख्य संयोजक यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. कोरोना युद्धात शहर व तालुका कोरोना मुक्त ठेवण्यासाठी महत्वपुर्ण योगदान देणारे तहसिलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,
इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा,नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे, डॉ. माधुरी चंदनशिवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांच्या सह आरोग्य, महसूल, नगरपरिषद, पोलीस कर्मचारी, पत्रकार तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शिरखुर्मा पार्टीत सहभागी झाले होते. या सर्वांचा शहा नर्सरीच्या वतीने पर्यावरण संतुलनासाठी रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश महाजन, अविनाश कोतमीरे, कल्पना भोर, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, बंडा चव्हाण, अशोक चिंचकर, अल्ताफ पठाण, सुरेश सोनवणे, शुभांगी खंडागळे, गणेश झरेकर, अमोल गारुडी यांनी प्रयत्न केले.
टिप्पण्या