इंदापूर शहरात कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढत चालला असल्यामुळे श्री नरसिंह प्रसादिक गणेश उत्सव मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कासार पट्टा परिसर व आसपासच्या परिसरामध्ये घर टू घर जाऊन बाहेर गावावरून आपल्या घरी कोणी नातेवाईक पाहुणे आले असल्याबाबत चौकशी करून नागरिक बंधू भगिनींची टेंपरेजर मेजरमेंट मशिने तपासणी करण्यात येत आहे सोबत त्यांना आरोग्याबाबत काळजी घेणे, सुरक्षित अंतर ठेवणे ,तोंडाला मास्क बांधणे ,हात साबणाने वारंवार धुणे, घरी कोण आजारी असेल किंवा तशी लक्षणे जर जाणवली तर न घाबरता ताबडतोब दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत व इतर व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी बाबत सूचना देण्यात येत आहेत. आता सर्वांनी जबाबदारीने वागून या कोरोनाव्हायरस च्या संकटाला न घाबरता धैर्याने आणि जिद्दीने संयम ठेवून त्याच्यावर आपल्याला मात करायची. इंदापूर शहरातील सर्व गणेश मंडळांनी अशाप्रकारे आपापल्या परिसरात घर टू घर जाऊन नागरिकांकडून माहिती घेऊन त्यांच्या शारीरिक तपासण्या करून लक्ष ठेवले तर आपलं इंदापूर शहर लवकरच कोरणा मुक्त होईल. प्रशासन गेले दोन तीन महिन्यापासून आपल्या शहरात या व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रात्रंदिवस आपल्यापरीने सर्वांची काळजी घेतच आहे पण आपली सुद्धा जबाबदारी आहे आपण सुद्धा जबाबदारीने वागले पाहिजे. एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून परंपरेनुसार श्री नरसिंह मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही सेवा सुरू केली
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या