वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ नातेपुते ( ता. माळशिरस ) येथील समता शिक्षण संस्थेच्या, समता इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ चा पहिला दिवस उत्साही वातावरणात व नवागतांच्या स्वागताने पार पडला. यावेळी सकाळपासूनच शिक्षक वर्ग शाळेच्या प्रवेशद्वारावरती विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास अतिशय उत्साही दिसत होते. चिमुकल्यांचा किलबिलाट या वातावरणात अजून रंग भरत होता. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री.भानुदास राऊत तसेच संस्थेचे सचिव कुमारी श्रद्धा राऊत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता लोंढे पर्यवेक्षिका सौ सुनिता फुले आणि सर्व पालक वर्ग यांच्या हस्ते गुलाबपुष्प आणि खाऊ देऊन करण्यात आले. याप्रसंगी शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी सकाळपासूनच पालकांची ओढ लागली होती. सदर स्वागत समारंभासाठी शाळेचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक पर्यवेक्षिका आणि पालक वर्ग व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.
SHIVSRUSTHI NEWS