मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*पालखी सोहळे महाराष्ट्राचे भूषण विठ्ठल साऱ्या विश्वाचे दैवत - हर्षवर्धन पाटील यांचा तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी चालत सहभाग*

इंदापूर :                   पालखी सोहळे हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. पंढरीची वारी हे महाराष्ट्राच्या धार्मिक, साामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राचे वैभव आहे. विठ्ठल साऱ्या विश्वाचे दैवत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.10) काढले.         हर्षवर्धन पाटील यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बुधवारी तरंगवाडी ते इंदापूर पर्यंत पायी चालत सोहळ्यात सहभाग घेतला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. दरम्यान, तरंगवाडी येथे हर्षवर्धन पाटील यांनी तुकाराम महाराज पादुकांचे दर्शन घेतले. सदर प्रसंगी देहू संस्थांचे माजी अध्यक्ष ह भ प बापूसाहेब मोरे महाराज यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला.              हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा अद्वितीय असा उत्सव आहे. आमच्या पाटील घराण्याला वारकरी परंपरा आहे.  मी गेली 30-32 वर्षे नियमितपणे संत तुकाराम म...