मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील -उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

इंदापूर : प्रतिनिधी दि.25/4/25 :- शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी सौं.भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड झाली.       शहाजीनगर (ता.इंदापूर) येथिल नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सौं.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड सोमवारी (दि.28) करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी दादासाहेब उत्तम घोगरे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.                निरा भीमा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. राज्यामध्ये सलग पाचव्यांदा पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणारा निरा भिमा हा एकमेव कारखाना आहे. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर शहाजी सभागृहामध्ये संचालक मंडळाची बैठक उपजिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी भाग्यश्...

*प्रा.डॉ.भिमाजी भोर यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले -हर्षवर्धन पाटील*

 इंदापूर :- तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कला शाखा प्रमुख व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिमाजी काशिबा भोर यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमाचे व अर्थशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शाहीर अमर शेख सभागृह येथे करण्यात आले होते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, प्रा. डॉ. भोर सर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.     हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रा.डॉ.भोर आणि त्यांच्या पत्नी कल्पना भोर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.       प्रा. डॉ. भिमाजी भोर यांनी सहकार्याच्या भावनेतून इंदापूर महाविद्यालयासाठी 30 मंच ( podium,dais) दिले.    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' नव्या पिढीने प्रा. डॉ. भोर सर यांचा आदर्श घ्यावा. भोर सर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. दृढ निश्चय करीत आपले शिक्षण पूर्ण केले तसे...

वाल्हेत मुस्लीम बांधवांकडून पहलगाम घटनेचा तीव्र निषेध

वाल्हे  प्रतिनिधी - सिकंदर नदाफ  जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर तसेच तेथील स्थानिकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील मुस्लीम बांधवांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी वाल्हेतील शाही सुन्नी मस्जिदमध्ये जुम्माची नमाज अदा केल्यावर येथील मुस्लीम बांधवांनी हातावर काळ्या फिती बांधून पहलगाम येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या दरम्यान मौलाना मुनीर शेख म्हणाले मोहम्मद पैगंबरांनी मुस्लीम समाजाला शांततेची शिकवण दिली आहे.मात्र निष्पाप लोकांना ठार मारणे त्यांच्यावर भ्याड हल्ला करणे अशा कृत्याला इस्लाम धर्मात अजिबात थारा नाही . त्यामुळे अशा भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. याप्रसंगी चांदभाई शेख सिकंदर इनामदार आरिफ आतार असलम पठाण आयुब इनामदार असलम नदाफ आयान आतार इर्शाद तांबोळी इरफान आतार अलतमश तांबोळी मुबारक इनामदार शकुर शेख अक्रम इनामदार आदी मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे "जागतिक दर्जाचे स्मारक" उभारावे, ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मंत्री दत्तात्रय भरणे यांची मागणी.

इंदापूर, प्रतिनिधी. संदेश शहा. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्षानिमित्त त्यांच्या जन्मस्थळी मौजे चौंडी ( ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे "जागतिक दर्जाचे स्मारक" उभा करावे, त्यासाठी चौंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित विभागास ५०० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करून मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती राज्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्री भरणे यांनी दिनांक २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले. या निवेदनात मंत्री भरणे यांनी म्हटले आहे की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष सध्या साजरे होत असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व योगदानाचा समयोचित गौरव करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म मौजे चौंडी ( ता. जामखेड, जि. अहिल्यानगर ) येथे झाला. धनगर स...

जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ पुणे सकल जैन समाजाचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन,

इंदापूर, डॉ. संदेश शहा. बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईतील विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर बुलडोझरच्या सहाय्याने बेकायदेशीर रित्या उध्वस्त केल्याच्या निषेधार्थ हजारो पुणे सकल जैन समाजाच्या वतीने दि. २२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जैन समाजातील हजारो स्त्री-पुरुषांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. न्यायालयाचा आदेश झाला नसताना देखील मनमानी पद्धतीने मंदिर पडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, उध्वस्त केलेल्या मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निमाण व्हावे या प्रमुख मागणीचे पत्र पुणे सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने दि. १६ एप्रिल रोजी विलेपार्ले येथील जैन मंदिर सर्व कायदेशीर बाबी समजून न घेता बृहन्मुंबई महापालिके तर्फे अत्यंत क्रूर पद्धतीने बुलडोझर व जेसीबीच्या सहाय्याने मंदिर उध्वस्त करण्यात आले. मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्य तसेच तीर्थंकर प्रतिमेची देखील विटंबना करण्यात आली. प्रशासनाच्या या जुलमी कारभारामुळे देशातील समस्त ...

*दुर्मिळ युरेशियन कोट प्रजातीच्या पक्षाचे प्राण श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे वाचले.*

इंदापूर:- काल रात्री शुभम धारूरकर याचा मला फोन आला दादा दत्त मंदिराजवळ परदेशी यांच्या बांधकामातील टाकीत दोन दिवसापासून एक पक्षी पडलेला आहे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातून हा वेगळा पक्षी वाचवण्यासाठी त्वरित मी त्या ठिकाणी पोहोचलो आमचे मित्र पक्ष मित्र वेदांत घोरपडे याला फोन करून त्या ठिकाणी बोलून घेतलं सात ते आठ फूट खोल अशा टाकीत तो बक्षी वारकरी किंवा युरेशियन कूट पडलेला होता मदत करायला गेल्यास तो घाबरून त्याच्या मोठ्या चोचीने आणि बळकट नक्यांनी हल्ला करीत होता वेदांत नाही ग्लोज घालून त्याला पकडलं आणि माझ्या जवळच्या बास्केटमध्ये त्याला ठेवण्यात आला.  उत्तरेकडे थंडी वाढली की हिवाळ्यात भारतात अनेक स्थलांतर करणारे पक्षी येतात. अशा पक्ष्यांपैकी एक अतिशय सामान्य आणि सहज ओळखता येणारा पक्षी आहे युरेशियन कूट. ह्याला मराठीत वारकरी असं नाव ठेवण्यात आलं आहे. असं नाव ठेवण्याचं कारण तो पक्षी पाहताच लक्षात येतं. मुख्यतः काळ्या रंगाच्या ह्या पक्ष्याचा कपाळावर किंवा डोक्याच्या पुढच्या बाजूला पांढर्‍या रंगाचा मोठा ठिपका असतो, अगदी पांढरी टोपी लावल्यासारखा.युरेशियन कूट किंवा वा...

अंबाजीच्या वाडीत भैरवनाथ देवाच्या एकदिवसीय यात्रेचे आयोजन

वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ  धार्मिक कार्यक्रमांसाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील अंबाजीच्या वाडीत श्री भैरवनाथ देवाच्या एकदिवसीय यात्रेचे आयोजन येत्या २८ एप्रिल रोजी करण्यात आल्याची माहिती वाल्हे ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच यात्रा महोत्सवाचे नियोजक अमोल पवार यांनी दिली. यावेळी यात्रेनिमित्त सोमवार (दि .२८ एप्रिल) रोजी पहाटे श्री. भैरवनाथ मंदिराचा गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे. त्यांनतर मंदिरात महापुजा अभिषेक दंडवत घेणे वस्त्र अलंकार तसेच नवस व नवसाची पूर्तता अशा धार्मिक कार्यक्रमांना सुरवात केली जाणार आहे. त्यांनतर देऊळवाड्या समोर गणराज मित्र मंडळाच्या वतीने झांज पथकाचा लक्षवेधी कार्यक्रम आटोपल्यावर देवाच्या छबिन्याला सुरवात केली जाणार आहे. या दरम्यान देवाचा भंडारा तसेच रात्रीच्या वेळी मा. हनुमंतराव देवकाते पाटील यांच्या लोकनाट्य तमाशाने या यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष दिगंबर पवार यांसह गुरुदत्त हॉटेलचे मालक पुनमशेठ पवार तसेच नवनाथ पवार हरिशचंद्र उर्फ अलबट पवार यांनी दिली.